Pune Crime News । पुणे : देशाला अजूनही दहशतवादाला (Terrorism) आटोक्यात आणता आले नाही. सतत दहशतवादाशी निगडित कारवाई केली जाते. अशातच आता इसिस महाराष्ट्र मॉड्युल (ISIS Maharashtra Module) प्रकरणामध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने (NIA) प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या एका डॉक्टरला अटक करण्यात यश आले आहे. डॉ. अदनानली सरकार (वय – ४३ वर्ष) असे त्याचे नाव आहे. (Latest Marathi News)
एनआयएने पुण्यामध्ये (Pune) एका इंजिनीअरला अटक केली होती. त्यामुळे त्यांनी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे शोधमोहीम राबवली. डॉ. सरकार तरुणांना प्रेरित करून संघटनेत भरती करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याला एनआयएने कोंढव्यातून (Kondhava) अटक केली असून त्याच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि इसिसशी संबंधित अनेक दस्तावेज जप्त केले आहे.
नुकतेच एनआयएने दोन दहशतवाद्यांना केली होती. अशातच आता तिसरा आरोपी पकडला असल्याने अल सफाच्या रतलाम मॉड्युलचा पर्दाफाश झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी सहा आरोपी सक्रिय असल्याचे एटीएसच्या (ATS) तपासात उघड झाले आहे. यामध्ये दोन मुलींचाही समावेश आहे.
Maharashtra Rain | पावसाचे थैमान सुरूच! अंगावर वीज कोसळून तिघांचा बळी
हे ही पहा