मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच प्रियंकाने तिचा ४० वा वाढदिवस साजरा केला आहे. प्रियांकाचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रियांकाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता याच सेलिब्रेशनमधला नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सध्या व्हयरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये निक आणि प्रियांका एकमेकांना किस करताना दिसत आहेत. त्याचबरोबर निक जोनस (Nick Jonas) त्याची सासू मधू चोप्रा यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे. तर प्रियांका चोप्रा देखील बीचवर डान्स करताना दिसत आहे.
प्रियांकाचा वाढदिवस मॅक्सिकोमध्ये दणक्यात साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे सर्व आयोजन तिचा पती निक जोनसने केले होते. वाढदिवसाला प्रियांकाच्या कुटुंबाचे सदस्य उपस्थित होते. वाढदिवसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.