मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच प्रियंकाने तिचा ४० वा वाढदिवस साजरा केला आहे. प्रियांकाचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसादरम्यानचा एक फोटो निक जोनसने (Nick Jonas) त्याच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आणि त्याचबरोबर प्रियांकाला एक टोपण नावही दिले आहे.
प्रियांकाचा वाढदिवस मॅक्सिकोमध्ये दणक्यात साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे सर्व आयोजन तिचा पती निक जोनसने केले होते. वाढदिवसाला प्रियांकाच्या कुटुंबाचे सदस्य उपस्थित होते. वाढदिवसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
निकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर केला आहेया फोटोला निकने हटके कॅप्शन देखील दिले आहे. विशेष म्हणजे फोटोमध्ये त्याने प्रियांकाला एक टोपणनावही दिले आहे. फोटो शेअर करत निकने कॅप्शनमध्ये लिहिले की, “लेडी इन रेड…प्रियांका चोप्रा”. सध्या या फोटोची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.