Nikhil Wagle । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या गाडीवर शाईफेक देखील करण्यात आली आहे.
माहितीनुसार, निखिल वागळे यांच्याकडून पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात ‘निर्भय बनो’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला. कार्यक्रमाला विरोध करत भाजप कार्यकर्ते सभागृहात जाऊन बसले होते. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढली होती. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर निदर्शने दिली होती.
हा सर्व प्रकार झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातल्या खंडोजी बाबा चौकामध्ये निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आता महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.