Nilesh Lanke । महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं आहे. महाविकास आघाडीत घटक पक्ष असणाऱ्या ठाकरे गटाला 21 जागा, शरद पवार गटाला 10 जागा आणि काँग्रेसला 17 जागा देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाने त्यांना उमेदवारीही दिली आहे. (Latest marathi news)
प्रचारादरम्यान निलेश लंके यांनी एक विधान केलं आहे. “लोक मला नोटही देतात आणि व्होटही देतात. यावेळी त्यांनी खिशातून पैसे काढून दाखवत कुणी, किती रुपये दिले,याची देखील माहिती दिली आहे. सर्वसामान्य लोकांकडूनच आपल्याला आर्थिक मदत मिळत आहे, असे निलेश लंके यांनी यावेळी नमूद केलं आहे. त्यांनी अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
Jayant Patil । “घासूनपुसून काम करा, कुणाच्या घरी चहा…”, जयंत पाटलांचा पदाधिकाऱ्यांना दम
एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले १०० रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने कष्टाने कमवलेले ५०० रुपये निवडणुकीसाठी मला मदत दिली, असेदेखील निलेश लंकेंनी यावेळी सांगितले आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना निलेश लंकेंनी केलेलं हे वक्तव्य आता खूप चर्चेत आलं आहे. सध्या राजकीय वर्तुळाची त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
Nana Patole । नाना पटोलेंच्या कार अपघातप्रकरणी धक्कादायक बातमी समोर