Nilesh Lanke । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का! आमदार निलेश लंके करणार शरद पवार गटात प्रवेश

Nilesh Lanke

Nilesh Lanke । लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात (Sharad Pawar group) सामील होणार आहेत. नीलेश लंके हे पारनेरचे आमदार असून ते अजित पवारांचे अत्यंत निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जात होते. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Lok Sabha Election । अखेर ठरलं! ‘या’ दिवशी जाहीर होणार लोकसभा निवडणुकीच्या तारखा

निलेश लंके यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी जाहीर होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे भाजपकडून सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीतून निलेश लंके अशी लढत आता होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. याआधी अहमदनगरची जागा खूप चर्चेत होती. खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि आमदार निलेश लंके यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar । पुण्यातल्या कोयता गँगला अजित पवार यांची थेट धमकी; म्हणाले, “आता डायरेक्ट…”

शरद पवार यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांचा पक्षप्रवेश सोमवारी होत आहे. मागच्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. आणि आता अधिकृतपणे ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! विश्वासू आमदाराने सोडली साथ, तर दुसऱ्या आमदाराची नाराजी जाहीर

Spread the love