Nilesh Lanke | अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha Constituency) निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. यामुळे अहमदनगरचे राजकीय वातावरणचांगलेच चांगलेच ढवळून निघाले आहे. मात्र निवडणुकीच्या काळात सुजय विखे यांनी लंके यांना इंग्रजी भाषेवरून चांगलंच डिवचलं होतं.
Politics News । सर्वात मोठी बातमी समोर! अजित पवारांच्या गटानंतर शिंदे गटात नाराजी
निलेश लंके यांनी माझ्यासारखे इंग्लिश बोलून दाखवावे, असं चॅलेंज विखे यांनी निलेश लंके यांना दिले. तर आज लंके यांनी हे चॅलेंज पूर्ण करून दाखवलं. आज अहमदनगर या ठिकाणी निलेश लंके यांनी इंग्रजीतून बोलूनही दाखवलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन सोहळा यंदा अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी लंके यांनी इंग्रजीतून बोलून दाखवलं आहे.
Narendra Modi | “मी नरेंद्र दामोदरदास मोदी…”, PM मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून इतिहास रचला
“सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं, ‘पवार इज पावर’ शरद पवारांचा करायचा नाही. त्यांचा नाद केला ना तर भल्या-भल्यांना ते घरी पाठवत असतात.”, अशी फटकेबाजी निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केली आहे. इंग्रजीतून बोलून त्यांनी यावेळी सुजय विखे यांना चांगलाच टोला लागलावला आहे.
पवार इज द पावर..!#NileshLanke #विजयाचा_शरदचंद्र #रौप्यमहोत्सवी_राष्ट्रवादी #Ahilyanagar pic.twitter.com/YDmroCePmu
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 11, 2024