Maharashtra Politics । राजकीय वर्तुळात खलबतं! उमदेवारी जाहीर होताच निलेश लंके मध्यरात्री बाळासाहेब थोरातांच्या भेटीला

Maharashtra Politics

Maharashtra Politics । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. नुकतीच शरद पवार गटाने 5 जागांसाठी उमेदवार (Sharad Pawar group candidate) जाहीर केले आहेत. पक्षाने बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे आणि वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी, तर दिंडोरीतून भास्करराव भगरे आणि अहमदनगरमधून नीलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी दिली आहे. (Latest marathi news)

Patiala News । धक्कादायक घटना! ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्याने 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

उमदेवारी जाहीर होताच निलेश लंके यांनी मध्यरात्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची भेट घेतली. निलेश लंके यांनी बाळासाहेब थोरात यांचे आशिर्वाद घेतले असून या दोन्ही राजकीय नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Nilesh Lanke meets Balasaheb Thorat)

Crime News । धक्कादायक! पुण्याजवळ बनवत होते पॉर्न व्हिडीओ, पोलिसांनी छापा टाकताच….

“राज्यातील सुसंस्कृत नेता म्हणून ओळख असणाऱ्या थोरात साहेबांची आज भेट घेतली आहे. भेटीदरम्यान, थोरात साहेबांनी निवडणुकीला सामोरे कसं जायचं, याचं मार्गदर्शन दिलं आहे. विखेंबाबत नगर दक्षिणची जनता योग्य तो निर्णय घेईल”, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी भेटीनंतर दिली आहे. दरम्यान, आता निलेश लंके तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 5 उमेदवारांची नावे केली जाहीर, जाणून घ्या कोण कुठून उमेदवार?

Spread the love