Nilesh Lanke । ब्रेकिंग! आमदार निलेश लंके आजच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार? मोठी माहिती समोर

Nilesh Lanke

Nilesh Lanke । मागच्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. निलेश लंके हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून साम टीव्ही ला मिळाल्याची माहिती मिळत आहे.

Accident News । भीषण अपघात! भरधाव कारने १० ते १२ जणांना चिरडलं; पाहा धक्कादायक व्हिडीओ

निलेश लंके हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी चार वाजता हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. जर निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

Lok Sabha Election । अशोक चव्हाणांचा काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

कोण आहेत नीलेश लंके?

2019 मध्ये नीलेश लंके हे महाराष्ट्रातील पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या जागेवर आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते लंके हे त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक कार्य आणि विकासात सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात. शरद पवार यांच्या गटात लंकेचा समावेश झाल्याने अजित पवार यांच्या गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Vasant More । सर्वात मोठी बातमी! वसंत मोरे करणार भाजपमध्ये प्रवेश? ‘त्या’ फोनवरून रंगली चर्चा

Spread the love