
Nilesh Lanke । आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची 111 वी जयंती असून अजित पवार यांनी सातारा प्रिती संगम येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वाट्याला किती जागा येणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की,” जागा वाटपाच्या मुद्द्यावर तिन्ही पक्षांनी प्राथमिक चर्चा केली. प्रत्येक पक्षाचा मान-सन्मान राखला जाईल,” असे अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Ajit Pawar । राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
त्याचबरोबर, निलेश लंके शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चांनावर देखील अजित पवार यांनी भाष्य केले आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “निलेश लंकेबाबत सुरु असलेल्या चर्चांबाबत काहीच तथ्य नाही, आम्ही कोणी चर्चा केली नसून निलेश लंके शरद पवार गटात जाणार अशी चर्चा माध्यमांमध्येच सुरु आहे. मात्र त्यामध्ये काहीच तथ्य नाहीय असं अजित पवार म्हणाले आहेत.
महायुतीची बैठक आज किंवा उद्या होऊ शकते
महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटला नाही. लवकरच जागावाटपावर अंतिम निर्णय होऊ शकतो. जागावाटपाबाबत (Loksabha election seats) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वातावरण खराब होईल, गढूळपणा येईल अशी वक्तव्य टाळावी, ही माझी भावना आहे. आमचा समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. महायुतीची बैठक आज किंवा उद्या होऊ शकते,” असेही अजित पवार म्हणाले आहे.
Cabinet Meeting । सरकारकडून होळीपूर्वी मोठे गिफ्ट; घेतले धडाकेबाज निर्णय