Nilesh Lanke । शरद पवार गटात जाणार का? स्वतः आमदार निलेश लंके यांनी दिल स्पष्टीकरण

Nilesh Lanke

Nilesh Lanke । राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात (Sharad Pawar group) सामील होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून ते अजित पवारांचे अत्यंत निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जातात मात्र ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. आता यावर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Flipkart Sale । फ्लिपकार्टची धमाकेदार सेल! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा स्मार्टफोनसह टीव्ही, एसी; पहा ऑफर

निलेश लंके म्हणाले, “माझ्या प्रवेशाच्या अफवा आहेत. कोणीतरी अफवा पसरवत आहे. मोठ्या साहेबांनी देखील याबाबत कुठलं तथ्य नसल्याचे सांगितले आहे. मी आता दादांसोबत आहे;” असे निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले आहेत. त्यामुळे निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Nilesh Lanke । निलेश लंकेंच्या भूमिकेवर अजित पवार गटाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले…

कोण आहेत नीलेश लंके?

2019 मध्ये नीलेश लंके हे महाराष्ट्रातील पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या जागेवर आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते लंके हे त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक कार्य आणि विकासात सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात. शरद पवार यांच्या गटात लंकेचा समावेश झाल्याने अजित पवार यांच्या गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Bjp । भाजपाला मोठा धक्का! बड्या खासदाराने दिला राजीनामा, करणार कॉंग्रेसमध्ये प्रवेश?

Spread the love