Nilesh Lanke । निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून अहमदनगर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. सध्या या ठिकाणी निवडणुका झाल्या असल्या तरीदेखील हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. या ठिकाणी निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी लढत आहे. मागच्या काही दिवसापासून निलेश लंके यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
MLA P. N. Patil । सर्वात मोठी बातमी! आमदार पी. एन. पाटील यांचे निधन
सध्या देखील निलेश लंके यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. निलेश लंके यांनी एका व्यक्तीचा व्हिडीओ ट्विट करत ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले आहे, त्या ठिकाणी एक व्यक्ती फिरत असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात व्हिडीओ देखील शेअर केला आहे. सीसीटीव्हीमध्ये छेडछाड करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
निलेश लंके यांनी ट्विट करत लिहिले की, “काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय.. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतय”. सध्या हे ट्विट चांगलेच चर्चेत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामा पर्यंत आलाय.
— Nilesh Lanke – निलेश लंके (@Nilesh_LankeMLA) May 22, 2024
काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला.… pic.twitter.com/I0tZqYJpEI