Site icon e लोकहित | Marathi News

Nilesh Rane । राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी! निलेश राणे सोडणार भाजपची साथ, एकनाथ शिंदे गटात करणार प्रवेश

Nilesh Rane

Nilesh Rane । राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची राजकीय घडामोड घडत आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत. उद्या, 23 ऑक्टोबर रोजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणे त्यांच्या नव्या पक्षात सामील होतील. पत्रकार परिषदेत बोलताना, निलेश राणे यांनी स्पष्ट केले की, “नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात केली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार आहे.”

Ajit Pawar । पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात गाडीतुन 5 कोटी रुपये जप्त, अजित पवारांनी केला मोठा खुलासा; म्हणाले…

गेल्या काही आठवड्यांपासून निलेश राणे यांचे शिंदे गटात प्रवेश करण्याचे संकेत मिळत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात भाजपमध्ये आल्यानंतर मिळालेल्या सन्मानाबद्दलदेखील बोलले. “इथे मला अनेक नेत्यांनी आदर दिला. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी मला लहान भावाप्रमाणे सांभाळले,” असे निलेश राणे म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खूप चर्चा रंगल्या आहेत.

Politics News । राजकीय घडामोडींना वेग! रात्री अचानक पंकजा मुंडे अजितदादांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर; नेमकं काय घडलं?

निलेश राणे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यांनी यावेळी उल्लेख केला की, “मी कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी निवडणूक लढणार आहे.” त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या दैवताचे स्थान दिले आणि त्यांच्या विचारांचा आदर व्यक्त केला.

Pune News | सर्वात मोठी बातमी! पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त

याशिवाय, निलेश राणे यांनी ठरवले आहे की, त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने समर्थक एकत्र येतील. “मी लहान कार्यकर्ता आहे आणि मला निवडणूक लढायची आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश हा फक्त वैयक्तिक नाही, तर एक महत्त्वाचा राजकीय संदेश म्हणून देखील पाहिला जात आहे.

Udhav Thackeray Shivsena Candidates । सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाची 53 उमेदवारांची यादी जाहीर; या नेत्यांचा पत्ता कट?

Spread the love
Exit mobile version