
Gargi Phule in NCP : मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. निळू फुले यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दत 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल आहे. त्यांची मुलगी गार्गी फुले (Gargi Phule) ही सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या गार्गी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. काय आहे ते कारण, चला तर मग जाणून घेऊया…
साहिलने हातात बांधलेल्या त्या दोऱ्याबद्दल समोर आलं ‘हे’ सत्य; पोलीसांचा अधिक तपास सुरू
अभिनेत्री गार्गी अभिनय क्षेत्रात सक्रिय असते. मात्र आता तिने राजकारणात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केल आहे. गार्गी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, (Ajit pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant patil) यांच्या उपस्थितीत गार्गीने पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या गार्गी चर्चेत आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गार्गीने पक्ष प्रवेश केला आहे.
दरम्यान, राजकारणात प्रवेश करण्याबाबत बोलताना गार्गी म्हणाली की, अजित पवार आणि माझ्या वडिलांचे संबंध पूर्वीपासून चांगले होते. तसेच मला राजकारणात येऊन समाजासाठी काहीतरी करायचं आहे. हे माझं पूर्वीपासूनच एक स्वप्न आहे. अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची माझी खूप इच्छा आहे. त्यामुळे मला पक्षात काम करण्याबाबत विचारल्यानंतर मी लगेच होकार दिला.
साहिलने हातात बांधलेल्या त्या दोऱ्याबद्दल समोर आलं ‘हे’ सत्य; पोलीसांचा अधिक तपास सुरू