
सध्या हिंदी सिनेसृष्टीप्रमाणे मराठीत देखील बायोपिक (biopic) चित्रपटांची लाट आली आहे. नुकतीच प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी निळू फुले (Nilu Phule) यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांनी आजपर्यंत २५०हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड मोठा चाहता वर्ग कमवला आहे.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितला पुढचा प्लॅन; म्हणाले, “मशाल हे चिन्हं गेलं तरी…”
महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात माध्यमांशी बोलताना प्रसाद ओक म्हणाले की, या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण असणार किंवा कोणकोणते कलाकार असणार हे समोर आलेले नाही. दरम्यान, प्रसाद ओक यांनी निळू फुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये देखील त्यांनी बायोपिकविषयी माहिती दिली असुन ती पोस्ट निळू फुले यांची मुलगी गार्गी यांना टॅग केली होती.
ब्रेकिंग! आदित्य ठाकरेंची आमदारकी जाणार?
निळू फुले यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘अकलेच्या कांद्याची’ या मराठी लोकनाट्य कथेने केली होती. निळू फुले यांनी समाज कल्याणासाठी अनेक कामे केली आहे. त्यांचा आवाज देखील खूप प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की निळू फुले यांनी चित्रपटांमध्ये साकारलेली खलनायकची भूमिका इतकी वास्तविक होती की, खऱ्या आयुष्यातही स्त्रिया त्यांना घाबरून चार हात लांब राहिच्या.
एफडी करताय तर थोडं थांबा! ‘या’ आर्थिक गुंतवणुकीत सुद्धा आहेत मोठे तोटे