Anganvadi Strike। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावर तोडगा निघेना, नऊ हजार कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

Anganvadi Strick

Anganvadi Strike। मागील काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका मदतनिसांचे आंदोलन (Anganwadi Sevika Strike) सुरु आहे. त्यांच्या या संपामुळे जिल्ह्यातील पोषण आहाराचे काम ठप्प झाले आहे. सेवा समाप्तीच्या नोटिसा पाठवूनही हे आंदोलन बंद केले नाही. सध्या तब्बल नऊ हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर आहेत. त्यांच्या मागण्यांवर अजूनही तोडगा निघाला नाही. (Latest Marathi News)

Rohit Pawar । बारामती अ‍ॅग्रो कारवाईनंतर रोहित पवारांची पत्रकार परिषद, अजित पवारांवर साधला निशाणा

दरम्यान, जिल्ह्यात एकूण सात संघटना असून या संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे, असे मत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे आहे. जिल्हा परिषद प्रशासनातील सूत्रांनी ४०० सेविका कर्तव्यावर आहे, अशी माहिती दिली आहे. महिला व बालकल्याण विभागाने सेविकांना कामावर हजर न राहिल्याने दोन दिवसांत अडीच हजार सेविकांना नोटिसा बजावल्या आहेत.

Ajit Pawar । महायुतीत पडणार दरार? विदर्भात अजित पवार गटाची भाजपच्या 3 जागांवर नजर

या संपामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, साईश्रद्धा, अंगणवाडी सेविका मदतनीस आदी संघटना सहभागी झाल्या आहेत. मानधनात वाढ करणे, निवृत्तिवेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे या त्यांच्या मागण्या आहेत. संपामुळे २ लाख ९७ हजार बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Mahadev Betting App । मोठी बातमी! महादेव बेटिंग अ‍ॅपसंबंधी मुंबई क्राईम ब्रँचकडून पहिली अटक

Spread the love