सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कायम प्रयत्न करत असते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील सध्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने किसान क्रेडिट कार्ड धारकांना सुलभ कर्ज देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी बँकांना या सूचना दिल्या आहेत.
बिग ब्रेकिंग! महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील काही दिवसात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) एका बैठकीत भाग घेतला. यावेळी त्यांनी प्रादेशिक ग्रामीण बँकांना अपग्रेड करण्यासाठी मदत करण्यास सांगितले. याठिकाणी त्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा आढावा घेऊन या क्षेत्राला संस्थात्मक कर्ज कसे उपलब्ध करून देता येईल यावर विचारमंथन केले.
धक्कादायक! पती आवडत नाही म्हणून पत्नीने केला खून; गळा दाबून टाकले मारून
तसेच मासेमारी आणि दुग्ध व्यवसायात गुंतलेल्या सर्वांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) देण्याबाबत चर्चा झाली. बैठकी दरम्यान कृषी कर्जामध्ये ग्रामीण बँकेची महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या बँकांकडून शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळणार असल्याने त्यांचे अपग्रेड होणे आवश्यक आहे. असे निर्मला सीतारामन ( Nirmla Seetaraman) यांनी बैठकीत सांगितले.
‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय’; जितेंद्र आव्हाडांचे ट्विट चर्चेत