Nitesh Rane: शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतिवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, म्हणाले…

Nitesh Rane attacked Uddhav Thackeray over Shiv Sena-Sambhaji Brigade alliance, said…

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakarey) यांनी काल पत्रकार परिषदेत शिवसेना (shivsena) आणि संभाजी ब्रिगेड (sambhaji brigade) हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे (Manoj Akhare), पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. दरम्यान अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका देखील केली. आता नितेश राणेंनी (Nitesh Rane) देखील टिका केली आहे.

Indapur: इंदापुरात बंदुकीच्या धाकावर चोरट्यांनी लुटले 3 कोटी 60 लाख, पोलिसांत फिर्याद दाखल

काय म्हणाले नितेश राणे

अशातच भाजपा नेते निलेश राणेंनी संभाजी ब्रिगेडशी युती केल्यावरून उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.“उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्र मंडळाशीही युती करतील”, असं या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणाले आहेत.

याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळेंनी“शिवसेनेशी कुणीही युती करायला तयार नाही, उद्धव ठाकरेंवर खूप वाईट काळ आलाय”, असं विधान केलं होतं. “संभाजी ब्रिगेडने २०१९मध्ये ४० जागांवर निवडणूक लढवली. त्यांना ०.०६ टक्के मतं मिळाली. उद्धव ठाकरेंना इतकी कमी मतं मिळवणाऱ्या पार्टनरसोबत युती करावी लागतेय अस देखील बावनकुळे म्हणाले.

Devendra Fadnavis: “…विनाशकाले विपरीत बुद्धी”, शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया!

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले

शिवसेना(shivsena)आणि संभाजी ब्रिगेड (sambhaji brigade)हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती.आज शिवसेना सत्तेत नसताना संभाजी ब्रिगेड आमच्यासोबत आले, याचा मोठा आनंद आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी, व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे.तसेच महाराष्ट्रात सध्या प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचं कट कारस्थान सुरु आहे. या पार्श्वभूमवीर शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो अस देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *