Nitesh Rane । पोलीस माझं काहीच बिघडू शकत नाही असं मोठं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडिओ फक्त बायकोला दाखवतील असं देखील नितेश राणे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले असून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितेश राणे यांनी पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील निंबा फाटा या ठिकाणी हिंदू समाजाच्या वतीने एक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये बोलताना नितेश राणे यांनी पोलिसांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माझ्या कोणत्याही वक्तव्यावर पोलीस माझे काहीच बिघडू शकत नाही ते व्हिडिओ काढतायेत पण घरी जाऊन फक्त बायकोला दाखवतील. असं धक्कादायक विधान नितेश राणे यांनी केले आहे.
सभेमध्ये बोलताना नितेश राणे म्हणाले, “पोलिसांना माझे भाषण रेकॉर्ड करू दे.. जास्तीत जास्त काय करतील तर ते फक्त बायकोला दाखवतील.. आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकाल? जागेवर राहायचं आहे. असं वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.
Ajit Pawar । “पुन्हा एकदा मोदींना…”अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य