Nitesh Rane । ‘मला हवं तसं लीड मिळालं नाही तर….’ नितेश राणेंनी दिली थेट धमकी

Nitesh Rane

Nitesh Rane । सर्वत्र लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) तोंडावर सर्व राजकीय पक्ष आणि राजकीय नेते तयारीला लागले आहेत. निवडून येण्यासाठी राजकीय पक्ष साम, दाम, दंड, भेद असे सूत्र वापरत आहेत. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी थेट सरपंचांना दम दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest marathi news)

Dhananjaya Mahadik । धनंजय महाडिक यांनी लावली 5 कोटी रुपयांची शर्यत, नेमकं कारण काय?

सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी मिळू शकते. जरी राणेंना उमेदवारी जाहीर केली नसली तरी त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी प्रचार सुरु केला आहे. नुकताच सिंधुदुर्गमधील कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना सरपंचांना दम दिला आहे.

Sayaji Shinde । ब्रेकिंग! अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

“सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली तीच यंत्रणा आता राबवा. मी आगामी ४ जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे. जर मला हवा तसं लीड मिळालं नाही तर मागणी असणारा निधी देखील मिळणार नाही. मग माझी तक्रार करू नका, असा दम नितेश राणे यांनी या मेळाव्यात बोलताना भरला आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, बडा नेता नॉटरीचेबल; शिंदे गटात करणार प्रवेश?

Spread the love