भाजप नेते नितेश राणे कायमच विरोधकांवर टीका करत असतात. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना डिवचन नितेश राणे यांना चांगलेच महागात पडले आहे. स्थानिक आमदार माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाही, असं वक्तव्य राणेंनी केलं होत. आता त्यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतला आहे.
बिग ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब; दैनिक ‘सामना’तील नेमका दावा काय?
संग्राम जगताप म्हणाले, “नितेश राणे यांची उंची माझ्या शर्टाच्या गुंडी एवढी आहे. त्यामुळे त्यांच्या नजरेशी नजर भिडवता येत नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. आता त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता नितेश राणे हे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
“गौतमीचा तो व्हिडीओ व्हायरल अन् नेटकरी म्हणाले… ” पाहा Video
नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?
नितेश राणे हे नगर शहरामध्ये आले होते. यावेळी त्यांनी नाव न घेता आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली. ते म्हणाले होते, स्थानिक आमदार तुम्हाला वाचवायला येणार काय? माझ्या नजरेला उभा राहत नाही उगाच माझ्या वाटेला जाऊ नका असं नितेश राणे म्हणाले होते.