Site icon e लोकहित | Marathi News

Nitin Desai Death । नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, अजित पवार यांचे आश्वासन

Nitin Desai Death. Nitin Desai death case will be thoroughly investigated, Ajit Pawar assured

Nitin Desai Death । सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपले संपवण्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली. यामुळे कला विश्वाला तर धक्काच बसला आहे. यामुळे सर्व स्तरातून याबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. कलाकार तसेच राजकीय व्यक्तींनी देखील शोक व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis । गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली क्लीनचिट; नेमकं प्रकरण काय?

नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार. आशिष शेलार त्याचबरोबर मंगल प्रभात लोढा यांनी नितीन देसाई यांच्या पार्थिवाच अंतदर्शन घेतलं. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांच्या मृत्यू बाबत काही विधाने केली आहेत. (Nitin Desai Death)

Tomato Price Hike । सर्वसामान्यांना पुन्हा बसणार धक्का? टोमॅटोच्या किमती ३०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

“याबाबत अजित पवार यांना विचारले असता नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली आहे त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे”.

Goat Disease । सावधान! शेळी आणि मेंढ्यांमध्ये झपाट्याने पसरतोय हा जीवघेणा आजार

दरम्यान, नितीन देसाई यांच्या जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. आता त्यांच्या मृत्यू बाबत चौकशी करणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनले आहे.

Spread the love
Exit mobile version