Nitin Gadkari: “मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून…..”, नाना पटोलेंनी दिलेल्या ऑफरवर नितीन गडकरींनी केलं स्पष्ट विधान

Nitin Gadkari made a clear statement on Nana Patole's offer "I am a worker of Bharatiya Janata Party..."

मुंबई : काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari)यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे गडकरी भाजपवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच गडकरी यांना काँग्रेस पक्षातर्फे (congress party) अनेक ऑफर आल्या. यामध्ये गडकरी यांचं भाजपात (bjp) खच्चीकरण केलं जात असेल, तर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा, अशी ऑफर दिली होती. दरम्यान अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी नितीन गडकरींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांना साथ देऊ, असं विधान केलं आहे.

Shinde-Fadnavis: शिंदे-फडणवीसांमध्ये रात्री उशिरा तब्बल पावणे 2 तास बैठक, ‘या’ विषयांवर चर्चा

दरम्यान आता नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना काँग्रेसकडून देण्यात आलेल्या ऑफरबाबत स्पष्ट विधान केलं आहे. “मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचा स्वयंसेवक आहे. मी आयुष्यभर माझ्या विचाराप्रमाणे काम करेन, याबाबत माझ्या मनात स्पष्टता आहे, त्यामुळे माझ्या विचारधारेशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असं विधान गडकरींनी केलं आहे.

Uday Samant: “त्या उदय सामंतांना जाळून मारून टाकू…”, रिफायनरी विरोधकाने नाना पटोलेंसमोरच दिली जीवे मारण्याची धमकी

पुढे गडकरी म्हणाले की,” आता मला कुणी आमंत्रण द्यावं किंवा कुणी मला काय बोलावं? हा त्यांचा प्रश्न आहे. पण जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत माझी संघटना, माझा पक्ष आणि माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *