Nitin Gadkari: नितीन गडकरींची मोठी घोषणा! पुण्यातील चाकणजवळ उभारले जाणार MMLP पार्क

Nitin Gadkari's big announcement! MMLP Park to be set up near Chakan in Pune

मुंबई : पुण्यातील चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी हा नागरिकांसमोर खूप मोठा प्रश्न आहे. आता याच पार्शवभूमीवर वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली वरीष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. यानंतर नितीन गडकरींनी काही महत्त्वाच्या योजनांबद्दल माहिती दिली. यावेळी चाकणमधील एमआयडीसी पासून 27 किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरात मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येणार अशी घोषणा नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केली.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा नवा डाव; शिवाजी पार्क येथेच दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू

पुणे पावलेवाडी येथे 180 हेक्टरममध्ये हे लॉजेस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करार देखील करण्यात आला आहे. हा प्रकल्प संयुक्तपणे राबवत असल्याचे देखील गडकरी यांनी यावेळी सांगितले.पुण्यामध्ये लॉजिस्टिक पार्कसाठी जी जमीन अधिग्रहण करावी लागते. त्यासाठी NHAI तर्फे मी जिल्हाधिकाऱ्यांना एक ऑफर दिलीये. त्यानुसार ठिकठिकाणी NHAI च्या बाजूला लॉजिस्टिक पार्कसाठी जर जागा दिल्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारतर्फे दोन लाख कोटींच्या लॉजिस्टिक पार्कची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे अशा प्रकारची उपलब्ध झाल्यास ती या प्रकल्पांसाठी फायदेशीर ठरले असे नितीन गडकरींनी म्हणाले.

Pm Modi: भारतीय नौदलाच्या ध्वजावरून ब्रिटीश राज हटवलं, नवा ध्वज शिवाजी महाराजांना अर्पण

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “नाशिक फाटा येथे दोन मजली सहा पदरी रस्ता आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो असा तीन मजली उड्डाण पूल करण्यासाठी विचार देखील चालू आहे. पुणे विभागातील जमीन अधिग्रहणाच्या कामासाठी प्रशासनाने आणि मनपा अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत करावी.”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *