
Nitish Kumar Resigned । मागील दोन दिवसांपासून बिहारमध्ये (Bihar) राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अशातच आता मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा महागठबंधनला राम-राम ठोकला आहे. नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. बिहारमध्ये लवकरच भाजपसोबत (BJP) मिळून जेडीयू (JDU) सरकार स्थापन होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. (Latest marathi news)
राज्यात लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. मोदी सरकारविरोधात (Modi Govt) इंडिया आघाडी एकत्र आली आहे. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत होते. पण, आता इंडिया आघाडीतील सर्वात महत्वाचा पक्ष म्हणजे जेडीयूने पुन्हा एकदा भाजपची साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Nitish Kumar resigned as Chief Minister)
Vinod Patil । याचिकाकर्ते विनोद पाटलांनी केलं स्पष्ट, “कोणताच निर्णय झाला नाही, विनाकारण..”
दरम्यान, लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर नितीशकुमार हे पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आज बिहारच्या राजकारणात आज मोठा बदल पाहायला मिळत आहे.
Student Drowned In Water । हृदयद्रावक! पोहण्याच्या नादात गेला मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा जीव