नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानातून मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राज्यातील 10 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच 20 लाख लोकांना रोजगार देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या घोषणेने मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, आता आम्ही एकत्र आलो असून राज्यातील तरुणांना जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्या दिल्या पाहिजेत, अशी आमची इच्छा आहे. ते म्हणाले की, आमचे विचारही आता एक झाले आहेत.
उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी मुख्यमंत्र्यांची ही घोषणा ऐतिहासिक असल्याचे वर्णन केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, “गांधी मैदान, पाटणा येथून 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालक, आदरणीय मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांची ऐतिहासिक घोषणा: 10 लाख नोकऱ्यांनंतर, 10 लाख अतिरिक्त नोकऱ्या इतर व्यवस्थेतूनही दिल्या जातील.सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे.