Eknath Shinde: शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा निर्णय अद्याप नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

No decision yet to stop Shiv Bhojan Thali Scheme – Chief Minister Eknath Shinde

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारणे गोरगरिबात जनतेसाठी शिवभोजन थाळी योजना सुरु केली होती. पण हि योजना बंद होण्याच्या चर्चा चालू आहेत. राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारला या योजनेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे ही योजना बंद होण्याची चर्चा रंगत होत्या. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मलेरियाची लागण झालीय? चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, डासांपासून असा करा बचाव

शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही पण, या योजनेमध्ये गैरव्यवहार असल्याच्या तक्रारींवर आधी चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदेनी भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. व यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या बऱ्याच निर्णयांना स्थगिती देण्यात आली. तर काही निर्णयांमध्ये बदल करण्यात आलेत.

अशा पद्धतीने करा वाटाणा लागवड आणि व्यवस्थापन? मिळेल भरघोस उत्पन्न

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली होती. या योजनेअंतर्गत गोरगरिबांना 10 रुपयांत जेवण मिळत होते. त्याचबरोबर कोरोना काळात याची किंमत 5 रुपये करण्यात आली होती. राज्यामध्ये एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून वेगेवेगळ्या प्रकारची मदत देखील केली जाते.

Devendra Fadnavis: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *