आपण पाहतोच की तरुण मुलांना जर नोकरी (job) नाही मिळाली तर त्यातली बरीच मूल खचून जातात. पण काही अशी देखील असतात जी खचून न जाता नव्याने काहीतरी करतात. अशीच एक कथा आहे फरिदाबादच्या एका मुलाची आहे. या मुलाचे नाव अविनाश असून तो रस्त्यांवर मोटारसायकलवरून इडली-सांबार विकतो.
Cricket: चक्क ‘या’ क्रिकेटपटूंच्या प्रेमापोटी घेतला मित्राचा जीव, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अविनाशची स्टोरी swagsedoctorofficial या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेली आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की, फरिदाबादमध्ये रस्त्याच्या कडेला स्वादिष्ट इडली-सांबर (Idli-Sambar) विकणाऱ्या अविनाशला भेटा. त्याचे पदवीचे शिक्षण झाले असून आणि त्याने अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये टीम मेंबर म्हणून काम केले आहे. त्यांनी मॅकडोनाल्डमध्ये देखील नोकरी केली आहे. सध्या तो इडली विकतो. त्याच्याकडची इडली खूप स्वादिष्ट असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची कमाल! ‘या’ जिल्ह्यात तरुणांनी गटशेतीतून घेतले तब्बल 10 हजार क्विंटल बटाट्याचे उत्पादन
व्हिडिओमध्ये अविनाशने सांगितले की, “2019 मध्ये बीकॉम पूर्ण केले होते, त्यानंतर जवळपास 3 वर्षे मॅकडोनाल्डमध्ये देखील काम केले. त्यावेळी त्याच्या लक्षात आले कि आपण पण असाच काहीतरी फूड बिजनेस टाकला पाहिजे. पण मोटारसायकलवरून इडली-सांबार विकायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते. मागच्या तीन महिन्यापासून नोकरी नसल्यामुळे त्याने दुचाकीवर इडली-सांबार विकण्यास सुरुवात केली आहे”.
भाजीपाला उत्पादकांसाठी दिलासादायक! वाटाणा, शेवग्याचे भाव तेजीत, सविस्तर जाणून घ्या दर