नवी दिल्ली : पंजाबमध्ये शिख समुदायाचे ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून बळजबरीने धर्मांतरं होत आहेत’, या पार्श्वभूमीवर अकाल तख्तने पंजाब सरकारकडे कायदा करण्याची मागणी केली आहे. पंजाब येथील शीख समुदायातील नागरिकांचे ख्रिश्चन धर्मात जबदस्तीने धर्मांतर केल्याचं समोर आल्यानंतर अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी “यापुढे असे धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देऊन सरकारकडे यासंदर्भात कायदा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत 15 दिवसांत भूमिका मांडा, अन्यथा…
माध्यमांशी बोलताना हरप्रीत सिंग म्हणाले की, “आम्ही पंजाबमध्ये धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी अद्याप केली नव्हती. आम्हाला ती नको आहे. पण, राज्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता, शीख समुदायातील नागरिकांनी या कायद्याच्या मागणीबाबात गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, भारतीय कायद्यात धर्मांच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. तरी मागील काही काळापासून तथाकथित ख्रिश्चन मिशनरी अंधश्रद्धेच्या माध्यमातून शीख धर्मांतील नागरिकांचे जबरदस्तीने धर्मांतर करत आहेत. पंजाबमधील शीख आणि हिंदू धर्मातील नागरिकांना ख्रिश्चन बनवण्यासाठी त्यांची दिशाभूल केली जात आहे. हे सर्व सरकारच्या नाकाखाली सुरु आहे. मात्र, मतपेटीसाठी सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही,” असा आरोपही सिंग यांनी यावेळी केला आहे.
5 सप्टेंबर रोजी येथे मेळाव्याच्या आयोजन
शिख समुदाय कोणत्याही धर्मांच्या अथवा त्यांच्या मूल्यांच्या विरोधात नाही. तर, धर्मांच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या विरोधात आहे. आम्ही स्वत: आमच्या धर्मातील अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. बायबल सुद्धा अशा लोकांची निंदा करते. पण, येथे अंधश्रद्धेचा वापर शीख समुदायातील नागरिकांना आमिष दाखवण्यासाठी केला जात आहे,” असेही ग्यानी हरप्रीत सिंग यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पंजबामधील आनंदपूर साहिब येथे शीख समुदायाने 5 सप्टेंबर रोजी त्यांनी आपला मेळावा देखील आयोजित केला आहे.
Shinde-Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चाना उधाण