
मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना (Sanjay Raut) ईडीने अटक केली तसेच त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची देखील काल ईडीने चौकशी केली. या प्रकरणावर बोलताना संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut ) यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले आमच्या कुटुंबावर कितीही अन्याय झाला तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही.
सुनील राऊत म्हणाले, संजय राऊत हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे. ते बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहेत. त्यामुळे संजय राऊत भष्ट्राचार करू शकत नाहीत. काल वर्ष राऊत (Varsha Raut) यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. कदाचित उद्या मला बोलावण्यात येईल. पण मी मला भाजपाला एवढंच सांगायचं आहे, की आमच्या कुटुंबावर कितीही अन्याय केला तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही”.
पुढे ते म्हणाले, संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या केसमध्ये कोणतीही गोष्ट खरी नाही. मुंबईमध्ये कोणी किती संपत्ती गोळा केली आहे, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, आमच्या सर्व संपत्तीची लिंक पत्रचाळ प्रकरणाशी लावण्यात येत आहे.”