Amol Kolhe । सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या काही सहकारी नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NCP) फोडत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना खूप मोठा धक्का बसला. शरद पवारांचे जवळचे आणि विश्वासू नेत्यांनी त्यांची साथ सोडली. तरीही त्यांनी न डगमगता पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)
Virat Kohli । वर्ल्ड कपपूर्वी किंग कोहलीचा धक्कादायक निर्णय, संघाची सोडली साथ
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे हे काल एका आयोजित कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी पारितोषिक वितरण समारंभादरम्यान पारितोषिक स्वीकारल्यानंतर एका चिमुकल्याने अमोल कोल्हे यांच्या कानात ‘काहीही झाले तरी पवार साहेबांची साथ सोडू नका,’ अशी भावनिक साद घातली. त्याचे उद्गार ऐकून अमोल कोल्हेंना आश्चर्याचा धक्का बसला. (Amol Kolhe News)
हर्षवर्धन पाटील असे या चिमुकल्याचे नाव आहे. कार्यक्रमात बोलत असताना आवर्जून अमोल कोल्हे यांनी त्याचा उल्लेख करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. अशातच शरद पवार हे पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आपली बाजू मांडतील. त्यामुळे निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निकाल देईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Raju Shetti । साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टी यांचा गंभीर इशारा