मागील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर होते. विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) भाजपामध्ये ( BJP) प्रवेश करणार अशा चर्चा सर्वत्र सुरू होत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Prakash Aambedkar) यांनी एक मोठा दावा केला होता. येत्या १५ दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात दोन मोठे बॉम्बस्फोट होतील. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
पुणे विद्यापीठातील रॅपसाँग प्रकरणी अजित पवार यांनी व्यक्त केला संताप; म्हणाले…
त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात सुरू असणाऱ्या सत्तासंघर्षावर देखील विधान केले. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी कोर्टाला कुणालाच अपात्र करण्याचा अधिकार नाही. तसेच कदाचित विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईवर असणारी स्थगिती उठवली जाईल. असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. आता यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेकिंग! कांदा अनुदानाच्या अर्जासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
अंबादास दानवे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप तर होणारच आहे, असं विधान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. सध्या त्यांचे वक्तव्य चर्चेत आहे.
समोश्याबद्दल ‘ही’ माहिती तुम्हाला माहिती आहे का? कधीही न ऐकलेली माहिती वाचून व्हाल थक्क