Best Automatic Cars । भारतीय बाजारात (Indian Market) सतत एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच होत असतात. वेगवेगळ्या कंपन्या आपल्या पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक तसेच सीएनजीवर चालणाऱ्या कार (Car) बाजारात आणतात. यावर्षी म्हणजे जानेवारी महिन्यापासून जवळपास सर्वच कंपन्यानी आपल्या कारच्या किमतीत वाढ (Car Price Hike) केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त किमतीत कार खरेदी कराव्या लागत आहेत. (Latest Marathi News)
Kusum Solar Yojana । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज, कसं ते जाणून घ्या
परंतु आता तुम्ही बाजारातून सहज ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असणाऱ्या कार स्वस्तात खरेदी करू शकता. मारुतीच्या लोकप्रिय कार तुम्ही घरी नेऊ शकता. सर्वात आनंदाची बाब म्हणजे या कारमध्ये तुम्हाला २५ किलोमीटर प्रतिलीटर मिळेल. सात लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. पहा त्यांची यादी.
Maharashtra Politics । स्वाभिमानीतील वाद पेटण्याची शक्यता? रविकांत तुपकरांना दिली 15 ऑगस्टची डेडलाईन
Maruti S-Presso
लिस्टमधील पहिली कार आहे Maruti S-Presso. एखाद्या एसयूव्ही प्रमाणे दिसणारी कंपनीची ही हॅचबॅक कार आहे. किमतीचा विचार केला तर कारची किंमत 5.76 लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) सुरु आहे. 25 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज असणाऱ्या कारमध्ये 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले आहे.
Sharad Pawar । शरद पवार यांना पुन्हा मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी?
Maruti Celerio
भारतीय बाजारातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार म्हणून मारुतीच्या Celerio ची ओळख आहे. मारुती सुझुकीच्या या कारची किंमत 6.38 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये 26.68 किलोमीटर मायलेज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.
Eknath Shinde । एकनाथ शिंदेंना मोठा झटका! वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे
Maruti Alto K10
मारुतीची अल्टो के10 ही 24 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज इतके मायलेज देते. कारच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर किंमत 5.61 लाख रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरू होते. पेट्रोल इंजिन असणाऱ्या या कारमध्ये 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
Maruti WagonR
आता मारुतीची ही कार ऑटोमॅटिक पर्यायात उपलब्ध आहे. या कारची किंमत 6.54 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. 24 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देणारी ऑटोमॅटिक व्हर्जन चार व्हेरियंटमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल.
Politics News । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रेवर सुनावणी घेणार
Renault Kwid
रेनॉल्टची ही कार तुम्हाला 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह खरेदी करता येईल. कारचे मायलेज 22 किलोमीटर प्रतिलीटर असून किंमत 6.12 लाख रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरू होते.
Jio Upcoming 5G Smartphone । ‘इतक्या’ स्वस्तात लाँच होणार जिओचा 5G फोन, मिळतील भन्नाट फीचर्स