पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे अशी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मागणी केली आहे. त्यामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत. याआधी देखील संभाजी ब्रिगेडने याबाबत मागणी केली होती. मात्र आता मिटकरी यांच्या मागणीला आनंद दवे (Anand Dave) यांनी विरोध दर्शविला आहे.
पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे, राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांची मोठी मागणी
आनंद दवे म्हणाले, पुणे शहराच्या नामांतराची काही गरज नाही. जिजाऊ यांचं भव्य स्मारक उभारा. ते लाल महाल या ठिकाणी उभारा असं म्हणत त्यांनी मिटकरींच्या मागणीला याला विरोध केला आहे. आता आनंद दवे यांनी विरोध दर्शविल्यामुळे पुण्याच्या नामांतराला वेगळं वळण लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर पुढे दवे म्हणाले, पुणे हे नाव पुण्यश्वर महादेवामुळे पडले आहे. त्यामुळे ते बदलण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
या संदर्भात अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार”. सध्या त्यांचे ट्विट खूप चर्चेत आहे.