Ajit Pawar । “दंगलीसारख्या घटना कुणालाही परवडत नाहीत” – अजित पवार

"No one can afford incidents like riots" - Ajit Pawar

Ajit Pawar । सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी (Pusesavali) येथे आक्षेपार्ह सोशल मीडिया (Social media) पोस्टवरून दंगल उसळली होती. या दंगलीत एकाचा मृत्यू झाला होता आणि १० जण जखमी झाले होते. दंगलीनंतर ७२ तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) अचानक पुसेसावळीत दाखल झाले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. (Latest Marathi News)

Eknath Shinde | गणेशभक्तांसाठी गुडन्यूज! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर खात्यात जमा होणार ‘इतके’ पैसे

यावेळी अजित पवार यांनी पुसेसावळीतील नुकसानीची पहाणी करत संवाद साधत शांतता राखण्याचे आवाहन केले. दंगलीचा बळी ठरलेल्या नूरहसन शिकलगार याच्या घरी जाऊन शिकलगार कुटुंबियांचे सांत्वन देखील केले. त्यांनी नूरहसनचे आई-वडील आणि पत्नीशी संवाद साधला. तर काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी येथे भेट दिली होती. त्यांनीही ग्रामस्थांची आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

Amruta Fadnavis । मोठी बातमी! अमृता फडणवीस खंडणीप्रकरणी अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर

“दंगलीसारख्या घटना कोणालाही परवडणाऱ्या नाहीत. गावात शांतता, सुव्यवस्था राखली जावी. आपल्यात तशी पद्धत देखील नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना, बारा बुलतेदारांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापन केली होती. त्याच पद्धतीने आपण देखील पुढे गेले पाहिजे. या गुन्ह्यातील दोषींना योग्य शिक्षा होईल,” असा विश्वास अजित पवार यांनी दिला आहे.

Gopichand Padalkar । पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार समर्थक आक्रमक; दिसेल तिथे चोप देणार असल्याचा दिला गंभीर इशारा

Spread the love