राजकीय वर्तुळात सध्या अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. अगामी लोकसभा निडवणुकांच्या अनुषंगाने भाजपने ‘महाविजय २०२४’ चे धोरण आखले आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे (Pune) येथील बालगंधर्व मंदिरमध्ये भाजपची ( BJP) ‘प्रदेश कार्यकारिणी बैठक’ पार पडली. यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडी व आघाडीमधील नेत्यांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. ( Devendra Fadanvis roasts sharad pawar)
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोणतीही निवडणूक असो जिल्हा परिषद असो किंवा लोकसभा-विधानसभा निवडणूक असो, आपला निवडून येण्याचा फॉर्मुला एकच आहे. तो म्हणजे नरेंद्र मोदीजी यांची कार्यशैली. महाराष्ट्रामध्ये कर्नाटक पॅटर्न चालणार नाही. इथे फक्त मोदींचा पॅटर्न चालणार.” असं फडणवीस म्हणाले आहेत.
पुण्यातील ट्राफिक कर्मचारी निलंबित; लाच घेताना कॅमेरात कैद
त्याचबरोबर ते पुढे बोलताना म्हणाले, “सध्या राज्यात सगळीकडे भाकरी फिरवण्याबाबत चर्चा आहे. त्यातील एक पक्ष भाकरी फिरवतो, दुसरा पक्ष भाकरीचे तुकडे करतो आणि तिसरा पक्ष पूर्ण भाकरीच हिसकावून घेतो. पण आम्ही भाकरी फिरवत नाही तर गरिबांच्या भाकरीची चिंता करतो. फक्त भाजपलाच गरिबांच्या भाकरीची चिंता आहे. ” तसेच महाविकास आघाडीचे सरकार हे विश्वासघाताचे सरकार होते असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
Devedra Fadanvis | शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावरून देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी, म्हणाले…