Site icon e लोकहित | Marathi News

महाराष्ट्रात दुसरा कोणताही पॅटर्न चालणार नाही, फक्त मोदी पॅटर्न चालणार; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना गंभीर इशारा

No other pattern will work in Maharashtra, only Modi pattern will work; Devendra Fadnavis' serious warning to opponents

राजकीय वर्तुळात सध्या अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. अगामी लोकसभा निडवणुकांच्या अनुषंगाने भाजपने ‘महाविजय २०२४’ चे धोरण आखले आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे (Pune) येथील बालगंधर्व मंदिरमध्ये भाजपची ( BJP) ‘प्रदेश कार्यकारिणी बैठक’ पार पडली. यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडी व आघाडीमधील नेत्यांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. ( Devendra Fadanvis roasts sharad pawar)

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा! हुल्लडबाजांनी केला थेट मीडियावरच हल्ला, अनेकजण जखमी

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोणतीही निवडणूक असो जिल्हा परिषद असो किंवा लोकसभा-विधानसभा निवडणूक असो, आपला निवडून येण्याचा फॉर्मुला एकच आहे. तो म्हणजे नरेंद्र मोदीजी यांची कार्यशैली. महाराष्ट्रामध्ये कर्नाटक पॅटर्न चालणार नाही. इथे फक्त मोदींचा पॅटर्न चालणार.” असं फडणवीस म्हणाले आहेत.

पुण्यातील ट्राफिक कर्मचारी निलंबित; लाच घेताना कॅमेरात कैद

त्याचबरोबर ते पुढे बोलताना म्हणाले, “सध्या राज्यात सगळीकडे भाकरी फिरवण्याबाबत चर्चा आहे. त्यातील एक पक्ष भाकरी फिरवतो, दुसरा पक्ष भाकरीचे तुकडे करतो आणि तिसरा पक्ष पूर्ण भाकरीच हिसकावून घेतो. पण आम्ही भाकरी फिरवत नाही तर गरिबांच्या भाकरीची चिंता करतो. फक्त भाजपलाच गरिबांच्या भाकरीची चिंता आहे. ” तसेच महाविकास आघाडीचे सरकार हे विश्वासघाताचे सरकार होते असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

Devedra Fadanvis | शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावरून देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी, म्हणाले…

Spread the love
Exit mobile version