सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुमल नावाच्या एका शेतकरी कुटूंबातील मुलीचा आहे. ही मुलगी अवघी 15 वर्षाची असून मागील दोन वर्षांपासून ती क्रिकेट खेळत आहे. मुमलच्या गावातील प्रशिक्षक तिला क्रिकेट शिकवतात. ही मुलगी अगदी खेड्यातील व सामान्य कुटूंबातील असून देखील उत्तम क्रिकेट ( cricket) खेळते. टीम इंडियाचा जबरदस्त खेळाडू सुर्यकुमार यादव (Surykumar Yadav) यांच्यासारखा 360 डिग्री मध्ये सिक्स सुद्धा मारते. यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे.
एलोन मस्क यांचे ट्विट चर्चेत; कुत्र्याचे फोटो टाकत माजी सीईओंना डिवचले
दरम्यान सोशल मीडियावर मुमलचे स्वतःचे अकाउंट आहे. यावर ती व्हिडीओ पोस्ट करत असते. आपल्या मुलीला एक दिवस टीम इंडियामध्ये खेळताना पाहायचे आहे, अशा प्रतिक्रिया मुमलच्या आईवडिलांनी दिली आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुमलला सात बहिणी आणि भाऊ आहेत. तिचे वडील सामान्य शेतकरी आणि आई गृहिणी आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ; महेश आहेर मारहाण प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल
मुमलचे प्रशिक्षक रोशन खान सांगतात की, मुमलचा खेळ अप्रतिम आहे. तिच्याकडे शूज नाहीत मात्र तिला त्याची पर्वा नाही. मुमलला फक्त क्रिकेट खेळायचे आहे आणि काहीतरी वेगळे करून दाखवायचे आहे. गोलंदाजीतसुद्धा ती निष्णात आहे. राजस्थान सरकारने आयोजित केलेल्या ऑलिम्पिकमध्ये कोणीही तिचा पराभव करू शकला नाही. यावेळी ती जिल्ह्यातील टॉपर ठरली. गावातील सरकारी शाळेत शिकणारी मुमल अभ्यासातही वेगवान आहे. मुमलकडे प्रचंड टॅलेंट आहे मात्र तिने पुढे जाण्यासाठी आर्थिकदृष्ट्या समर्थ असणेही आवश्यक आहे.
शिंदे व भाजप समर्थकांमध्ये तुफान राडा! पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप