पुण्यात सध्या चिंचवड व कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि महाविकास आघाडीकडून आपले उमेदवार जाहीर केले जात आहेत. चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. थोरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात हा अर्ज भरण्यात आला.
मोठी बातमी! रामदेव बाबा यांच्याविरोधात गुन्हा दाखल
यावेळी अश्विनी जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत पदयात्रेद्वारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या पदयात्रेत लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अश्विनी जगताप यांनी अर्ज भरताना त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेश लांडगे उपस्थित होते.
लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरे भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाले…
दरम्यान चिंचवड मधील राजकीय वर्तुळात भरपूर घडामोडी घडल्या आहेत. दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांचे मोठे बंधू शंकर जगताप यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. या पोटनिवडणूकीमध्ये एकाच घरातील दोन व्यक्ती एकमेकांच्या विरोधात उभ्या राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चिंचवड मध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला संधी देण्यात आली आहे. परंतु, राष्ट्रवादीने ( NCP) अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
ऊसतोड कामगाराच्या मुलाचा मृत्यु, थंडीचा त्रास होतोय म्हणून चुलीसमोर ऊब घ्यायला गेला अन्…