राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ( Non Teaching Staff) बंद पुकारला आहे. येत्या 2 फेब्रुवारी पासून ते बेमुदत संपावर असणार आहेत. मागील तीन वर्षांपासून या कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक बैठका, आंदोलने, निवेदने व भेटी घेऊन देखील राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कोणतीच दखल न घेतल्याने राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
बाॅयफ्रेंडबद्दल आर्चीने केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘त्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही’
विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीकडून याबाबत इशारा देण्यात आला आहे. दरम्यान विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.
काय आहेत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
1) कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन
2) सातव्या आयोगानुसार वेतन
3) आश्वासित प्रगती योजना
या मागण्यांसाठी ( Demands) वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून यावर लक्ष दिले जात नाही. यामुळे कर्मचारी संयुक्त कृती समितीकडून 2 फेब्रुवारी पासून बेमुदत संप जाहीर करण्यात आला आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ होणार बंद? खुद्द दिग्दर्शकानेच मालिका सोडून सुरू केला नवीन कार्यक्रम