
मागच्या काही दिवसापासून उत्तर भारतात पावसाने (North India Rain) थैमान घातलं आहे. उत्तरभारतात मुसळधार पाऊस होत आहे. नद्यांना पूर आले आहेत. यामुळे त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतात पावसामुळं आत्तापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकांनां मदत करण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या अनेक तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)
राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार? ‘हे’ तीन बडे नेते आगामी निवडणूक लढवणार नाहीत
हिमाचल प्रदेशात 18 जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस होत आहे. त्याचबरोबर राजधानी शिमला (Shimla) येथे मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली असून त्यामुळे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वात मोठी बातमी! छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस
उत्तराखंडमध्ये देखील मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळं वाहनांचे अपघात आणि घरांची पडझड होऊन आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे
बुलढाणा अपघाताबाबत धक्कादायक खुलासा! जाणून घ्या अपघातावेळी नेमकं काय घडलं?
दरम्यान, या ठिकाणी पावसाचा कहर सुरूच आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 11 ते 12 जुलैसाठी, कुमाऊं आणि त्याच्या लगतच्या गढवाल, चमोली भागात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
काही सेकंदातच घरे, मोठी दुकाने वाहून गेली, शिमल्यात मुसळधार पावसाचा कहर; व्हिडीओ पाहून बसेल धक्का