Ajit Pawar । सत्तेसाठी नाही तर ‘या’ कारणामुळे अजित पवार भाजपसोबत, महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याचा दावा

Not for power but because of 'this' reason, Ajit Pawar with BJP, claims the big leader of Mahavikas Aghadi

Ajit Pawar । मुंबई : अजित पवार यांनी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजूनही राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा नव्या चेहऱ्यांना सोबत घेऊन पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. महायुतीत सामील होऊन जवळपास दोन महिने होतील तरी अजित पवार यांना अजूनही टीकेचा सामना करावा लागत आहे. (Latest Marathi News)

Amit Thackeray । मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक, सरकारविरोधात आजपासून जागर पदयात्रा

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी अजित पवार यांचे भाजपसोबत सत्तेत जाण्यामागचे कारण सांगितले आहे. “अजित पवार यांना ईडीची (ED) भीती आहे, यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. सत्तेसाठी मी भाजपसोबत (BJP) गेलो नाही हे ते खरे सांगत आहेत”, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Cotton Farming । दिलासादायक! यावर्षी कापसाला मिळणार चांगले दर, जाणून घ्या यामागचं कारण

माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यावरून टीका केली आहे. “अजित पवार म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा काम करणारा कोणीच नाही. त्यांना आत्ताच हा दृष्टात १०-२० वर्षांपूर्वी का झाला नाही? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या टीकेला अजित पवार कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Social Security । कोट्यवधी ग्राहकांसाठी SBI ने आणली नवीन सेवा, होणार मोठा फायदा

Spread the love