Sunny Deol । ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर आता ‘गदर 2’ (Gadar 2) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल, अमिषा पटेल (Amisha Patel), उत्कर्ष शर्मा आणि लव सिन्हा हे पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटामुळे सनी देओल चांगलाच चर्चेत आला आहे. (Latest Marathi News)
Nana Patole । “…तर मी मुख्यमंत्री होण्याची इच्छा लवकर पूर्ण व्हावी” नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य
सनी देओल हा काही काळापूर्वी चित्रपटांशिवाय खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला होता. त्याचे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडियाच (Dimple Kapadia) नाही तर, इतर अभिनेत्रींसोबतही प्रेमसंबंध होते. परंतु, या कोणत्याच अभिनेत्रींसोबत त्यांचे लग्न होऊ शकले नाही. इतकेच नाही तर मीडिया रिपोर्टनुसार त्यांचे डिम्पल कपाडिया सोबत लग्न झाले होते. परंतु पत्नीच्या धमकीमुळे त्यांनी प्रेमाचा त्याग केला.
डिम्पल कपाडियाशिवाय अभिनेत्री अमृता सिंग, रवीना टंडन आणि मिनाक्षी शेषाद्री सोबत देखील सनी देओल यांच्या नावाची चर्चा रंगली होती. सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा येत्या 11 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला चांगली पसंती मिळाली आहे.
Uddhav Thackeray । “उद्धव ठाकरे नमकहराम माणूस”, टीका करताना भाजप आमदाराची घसरली जीभ
गदर 2 आणि OMG 2 एकाच दिवशी होणार प्रदर्शित
दरम्यान, 11 ऑगस्ट रोजीच अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा OMG 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या दोन चित्रपटांपैकी प्रेक्षकांना कोणत्या चित्रपटाची भुरळ पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
आनंदाची बातमी! अवघ्या एका तासात मिटेल १२ वर्षांपूर्वीचा शेतीचा जुना वाद, ‘ही’ योजना येईल कामी