!["Not per Senabhavan but…", explains Udaya Samantha](http://elokhit.com/wp-content/uploads/2022/08/Uday-Samant-3-1024x538.jpg)
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दादरमध्ये प्रति शिवसेना भवन बांधणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. यावर अनेक राजकीय व्यक्तींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता यावर उदय सामंत यांनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. प्रति शिवसेना भवन नाही तर, जनसंपर्कासाठी कार्यालय बांधत असल्याचे स्पष्टीकरण उदय सामंतांनी (Uday Samant) दिले आहे.
उदय सामंत म्हणाले,“प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कासाठी कार्यालय बांधतोय, शिवसेना भवनाबद्दल आदर कायम आहे”, पुढे ट्विट करत म्हणाले, मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत हा गैरसमज पसरवला जात आहे..मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे..शिवसेना भवन बद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील.
मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत हा गैरसमज पसरवला जात आहे..मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे..शिवसेना भवन बद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील.
— Uday Samant (@samant_uday) August 12, 2022
दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यालयामधून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत.दादरमध्ये शिंदे गटाकडून प्रती सेनाभवन उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी दिली आहे. येत्या १५ दिवसामध्ये या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली.