उर्फी जावेद व भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh BJP) यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. उर्फीच्या अंगप्रदर्शन करण्यावरून चित्रा वाघ यांनी ट्विट करत तिला चांगलेच सुनावले होते. उर्फीने देखील मागे न हटता ट्विटवरून चित्रा वाघ यांना प्रतिउत्तर देणे सुरूच ठेवले. याकाळात चित्रा वाघ यांनी ‘उर्फीवर कायदेशीर कारवाई करून अटक करा’ अशी मागणी मुंबई पोलिसांकडे केली होती.
दरम्यान मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) या प्रकरणी दखल घेतली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फी जावेदला पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे उर्फी जावेदच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेदची ( Urfi Jawed) चौकशी होणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत.
“शरद पवारांनी सांगितले तर मी कोरड्या विहिरीत सुद्धा उडी मारेल”; आमदार निलेश लंके यांचे मोठे विधान
उर्फी जावेद तिच्या अजब फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील प्रचंड व्हायरल होतात. मात्र ती अंगप्रदर्शन करते असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. इतकच नाही तर ‘असला नंगानाच महाराष्ट्रात चालणार नाही’ असे देखील त्या उर्फीला म्हणाल्या होत्या. यावर उर्फी देखील मेरी डीपी ढासु, चित्रा मेरी सासू’ अशा प्रकारचे ट्विट करून चित्रा वाघ यांना डिवचत होती. यामुळे दिवसेंदिवस दोघींमधील वाद विकोपाला गेले आहेत.