आता राज्य शासनाने (state government) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राज्यातील कोरडवाहू शेतीची (dryland farming) जलसंधारणाच्या माध्यमातून उत्पादकता वाढविण्यासाठी सामुदायिक शेततळ्यासाठी अनुदानाची योजना सुरु केली आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत समुदायिक शेत तळ्यावर १०० टक्के अनुदान (grant) लाभर्त्यांना मिळणार आहे. परंतु या अनुदानाचा लाभ कोण घेवू शकतो? तसेच किती आकारमानाच्या शेततळ्याला किती अनुदान मिळेल?, यासाठी कोण-कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? तसेच यासाठी कुठ अर्ज करायचा?, आवश्यक कागदपत्रे कोणती? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहचले ‘वर्षा’ बंगल्यावर, ‘या’ विषयावर झाली चर्चा
सामुदायिक शेततळे लाभ घेण्यासाठीच्या पात्रता व अटी :
1) ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी समूह या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असणार.
2) सामुदायिक शेततळे हे दोन किंवा अधिक शेतकरी लाभार्थ्याने करणे आवश्यक असणारं.
3) लाभार्थी समूहाकडे जेवढे क्षेत्र असेल त्यासाठी आवश्यक क्षमतेचे सामुदायिक शेततळ्याचा लाभ त्या संबंधित शेतकरी समूहाला घेता येणार.
4) सामुदायिक शेततळ्यातील पाणी वापराबद्दल इतकंच नाही तर शेततळ्याच्या जमिनीबद्दल शेतकरी लाभार्थींमध्ये आपसामध्ये सामंजस्याचा करार करणे आवश्यक.
5) अर्ज करणारे शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावेत, ते वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत.
6) लाभार्थी शेतकऱ्यांचे जमीन धारणेबाबतचे खाते उतारे स्वतंत्र असणे आवश्यक.
मनाला सुन्न करणारी घटना, रुग्णालयाच्या छतावर सापडले 500 मृतदेह; शरीराचे अवयवही झाले गायब
असा करावा अर्ज?
अनुदानासाठी इच्छुक शेतकर्यांनी http://https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच त्यानंतर
आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. दरम्यान यासाठी सामुदायिक शेततळे नोंदणीसाठी अर्जासह ७/१२ उतारा व ८-अ प्रमाणपत्र आवश्यक असते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहचले ‘वर्षा’ बंगल्यावर, ‘या’ विषयावर झाली चर्चा