आपण रोज अनुभवतो की शेतकरी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळी पिके घेत असतात. तसेच या पिकांमधून (crop) शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेतात. परंतु शेतकऱ्यांना पिकांच्या कापणीवेळी शेतकऱ्यांना (farmers) भरपूर कष्ट घ्यावे लागतात. भात हे पीक खरीप हंगामातील (Kharif season) मुख्य पीक आहे. त्यामुळे आता भात पिकाच्या कापणीच्या मशीनमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहे.
पोलिसांना घरबांधणीसाठी मिळणार कर्ज; मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय
ती मशीन म्हणजे कंबाइंड हार्वेस्टर मशीन. ही कम्बाइंड हार्वेस्टर मशिन (Combined Harvester Machine) पिकांच्या काढणीसाठी उत्तम पर्याय आहे. महत्वाची बाब म्हणजे या यंत्राच्या सहाय्याने भात कापणी उत्तम प्रकारे करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट देखील वाचतात. कम्बाइंड कापणी मशीनमुळे अगदी कमी वेळेत कापणी करता येते. तसेच या मशीनचा खर्च देखील शेतकऱ्यांना पडवडत आहे.
Katrina Kaif: ‘या’ चित्रपटात कतरिना दिसणार भूताच्या भूमिकेत, प्रेक्षकांची उडणार घाबरगुंडी
शॉर्टी मशीन (Shorty Machine)
कडधान्य, हरभरा, सोयाबीन या लहान पिकांच्या काढणीसाठी शेतकऱ्यांना खूप कष्ट घ्यावे लागतेच. इतकंच नाही तर शेतकऱ्यांना तोटादेखील सहन करावा लागतोय. मात्र आता शेतकऱ्यांना ही काळजी मिटविण्यासाठी बाजारात एक शॉर्टी मशीन आहे. ज्याला रीपर मशीन (Reaper Machine) देखील म्हणता येईल. शॉर्टी मशिन हे लहान रोपेही सहज कापते. विशेष म्हणजे या मशीनमध्ये 50 सीसी 4 स्ट्रोक इंजिन आहे. तसेच यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले स्थापित केला आहे. हे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले जे काम कसे करायचे याची माहिती देते. हे मशीन शेतकऱ्यांना फक्त 30 हजार रुपयांमध्ये मिळेल. तसेच या मशिनला 1 वर्षाची वॉरंटीदेखील आहे.
Eknath Shinde: धक्कादायक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सही वापरून दुकानदाराला लावला १ कोटींचा चुना