महाराष्ट्रामध्ये पाऊस (Rain in Maharashtra) कधी पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासकरून शेतकऱ्यांचे पाऊसाकडे जास्तच लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची वाट पाहत आहे. आता पावसाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
प्रवाशांनी गच्च भरलेल्या बसचा टायर फुटला अन् झाला भीषण अपघात; १२ जण जखमी
काल मुंबईमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला आहे त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये नागपूर, नांदेड आणि काही ठिकाणी पाऊस झाला आहे. दरम्यान आता हवामान विभागाने दिलेल्या नवीन माहितीनुसार, 25 आणि 26 जून रोजी पुणे शहर आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महिलेने सिंहाला कवळीत पकडलं अन् पळत सुटली; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
पुढच्या 3-4 दिवसांमध्ये मान्सून जोर धरेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांमध्ये पाऊस आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दर्शना पवार हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुलला पैसे पुरवले अन्… समोर आली धक्कादायक माहिती