मुंबई : सांस्कृतिक कार्य व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantivar)यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी दूरध्वनी संभाषणावेळी ‘हॅलो'(Hello)ऐवजी ‘वंदे मातरम्’ (Vande mataram)म्हणावे अशी कल्पना मांडली होती.
दरम्यान आज याबाबतचा प्रत्यक्ष शासन आदेश (जीआर) आता जाहीर झाला आहे. आता ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचे हे केवळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी ( Forest Department employees) आणि तेही ऐच्छिक करण्यात आले आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवर याबाबत कसलीच जबरदस्ती नाही.
Raj Thackeray: राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांची नोटीस, सभेवेळी अटींचा भंग केल्याचा आरोप
नेमक काय आहे हे ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ प्रकरण
सुधीर मुनगंटीवार यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ही खाती देण्यात आली आहेत.त्यांच्याकडे मागील सरकारमध्ये अर्थमंत्री पद होत. दरम्यान यावेळी खातेवाटपानंतर काही दिवसात एका कार्यक्रमात बोलताना सरकारी कर्मचाऱ्यांनी ‘हॅलो’ या शब्दाऐवजी ‘वंदे मातरम’ हा शब्द वापरावा असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून त्यांनी हा निर्णय घेण्याचं ठरवलं होत.त्यावरून बरीच चर्चा आणि विनोदही झाले.