पुणे (Pune) शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. यामुळे कोयता गँगचा वाढता उपद्रव पाहून पोलीस प्रशासनाने काही ठोस पाऊले उचलली आहेत. कोयता गँगने ( Koyta Gang) माजवलेली दहशत व पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना पिस्तुल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इतकंच नाही तर एखादी घटना घडल्यास घटनास्थळी पोहचून कारवाई करणाऱ्या पोलिसांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तब्बल दोन वर्षानंतर एम.एस.धोनीचे कमबॅक; चाहते सुद्धा झाले हैराण
महत्वाची बाब म्हणजे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिसांना अत्याधुनिक दुचाकी उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. कोयता गँगला आळा घालण्यासाठी पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात पोलीस दिवसा व रात्री गस्त घालतात. मात्र या पोलिसांवर देखील हल्ले केले जात आहेत. यामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हे निर्णय घेतले आहेत. मागील महिन्यात विश्रांतवाडी येथे पोलिसांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना घरी जाऊन दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!
या पार्श्वभूमीवर शहरातील वेगवेगळ्या भागात गस्त घालणाऱ्या 250 पोलिसांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. गस्तीसाठी एकूण 125 दुचाकी उपलब्ध करून देण्यात येणार असून एका दुचाकीवर दोन पोलीस गस्त घालणार आहेत. दरम्यान ‘ रस्त्यावर पोलिसांची गस्त वाढली की गुन्हेगारांना धाक बसतो.’ असे मत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी व्यक्त केले आहे.
धक्कदायक! बाप दररोज दारू प्यायचा म्हणून बापाला कंटाळून दोघा मुलांनी जन्मदात्या बापाचीच हत्या केली